आज २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधकांनी गदारोळ घातला. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा आमदार चंद्रकांत पाटील आणि इतर मोठे नेते देखील या आंदोलनात सहभागी झाले होते.