Mumbai : मुख्यमंत्र्यांनी कोणाला तरी चार्ज द्यावा; चंद्रकांत पाटलांचा सल्ला

2021-12-22 11

#ChandrakantPatil #BJP #CmUddhavThackeray #StateGovernment #MaharashtraTimes
आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आहे. यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थित राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे . भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवर सवाल करत मुख्यमंत्र्यांनी कोणाला तरी चार्ज द्यावा असा सल्ला दिला आहे.

Videos similaires