सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आष्टीमध्ये महाविकासआघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. या सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी बहिण पंकजा मुंडे यांच्यासह भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ही अशी पहिली नगरपंचायतीची पंचायत झालेली निवडणूक असून उगीच गप्पा मारू नये, तीन जिल्ह्याचे आमदार तसं काही यात चालत नसतं असं म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे.
#DhananjayMunde #Beed #PankajaMunde