परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे ओबीसी एल्गार आंदोलन सुरु आहे...या आंदोलनाला रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी भेट दिली... त्यावेळी त्यांनी आंदोलकांना संबोधित केले.आमचं होऊ द्या 30 ते 35 आमदार 10 मिनिटांत ओबीसीची गंमत करून दाखवतो. मराठ्यांना आणि मुस्लिमांनाही आरक्षण देतो. मुस्लिमांवर तर किती अन्याय आहे. गॅरेज बघितले की मुस्लिम. अंड्याचे दुकान बघितले की मुस्लिम. कोंबडीचं दुकान बघितलं की मुस्लिम कुठं कलेक्टर नायं... बोंबाबोंब... राज्य चालवणारा तिसराच मालक असतो. म्हणून आपण ही गोष्ट लक्षातच ठेवली पाहिजे.मराठा समाजाला माझी विनंती आहे. शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण दिलं. मराठ्यांना आरक्षण होतं. पण नंतर मराठ्यांचं आरक्षण का गेलं ? छत्रपती राजे शिवाजी महाराज देखील ओबीसी होते. पण आमच्या तथाकथीत लोकांना वाटलं आम्ही लई मोठं आहे गावचं. आम्हाला नकोय तसलं आरक्षण. आणि आज आवस्था काय झाली आहे, असेही जानकर म्हणाले.
#obcreservation #reservation #obc #mahadevkjankar #obcreservationnews