शिवसेना नेते आणि ठाकरे सरकारमधील गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालाशी केली. गुलाबरावांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्हिडीओ शेअर करत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. "गुलाबराव पाटील यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या सुसंस्कृतपणाचा विसर पडला असून त्यांनी हे विधान मागे घेऊन तात्काळ माफी मागावी अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने त्यांना वठणीवर आणू", असं म्हणत नवनीत राणा यांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला आहे. गुलाबराव पाटील यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागावी किंवा दिलगिरी व्यक्त करुन विधान मागे घ्यावं, अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने गुलाबराव पाटलांना वठणीवर आणू", असा इशारा नवनीत रवी राणा यांनी दिला आहे.