नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी; बीडमध्ये मुंडे भाऊ-बहीण पुन्हा आमने सामने

2021-12-19 57

येत्या २१ डिसेंबरला होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मुंडे भाऊ-बहीण पुन्हा एकदा समोरासमोर आलेत. या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यात अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्यात. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांमध्ये सामना रंगला आहे. या निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या भाषणात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी ऊसतोड महामंडळाबाबत प्रश्न उपस्थित केले तर पंकजा मुंडे यांनी शेतकरी नुकसान भरपाई आणि पीक विम्यासंदर्भात धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

#pankajamunde ##DhananjayMunde #election #BEED