हुक्का पार्लरमध्ये होती तुफान गर्दी; पहाटे साडे तीन वाजता पोलिसांनी टाकला छापा

2021-12-18 28

करोना संसर्गामुळे निर्बंध असतानाही मुंबईतील वाकोला येथील ‘आऊल’ हुक्का पार्लरमध्ये खचाखच गर्दी होती. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास छापा टाकून ८० जणांना ताब्यात घेतले. या पार्लरमधून प्रतिंबंधित तंबाखू मिश्रित हुक्का जप्त करण्यात आला असून आतमध्ये परवाना नसतानाही बार सुरू होता.अडीच लाखाची दारू हस्तगत करून पोलिसांनी मालक, व्यवस्थापक, कर्मचारी अशा आठ जणांना अटक केली.

Videos similaires