काशी-विश्वनाथच्या कॉरिडोरच नुकतचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं. परंतु या लोकार्पणाच्या आधी मोदींनी केलेल्या एका कृतीमुळे सर्वत्र मोदींचं कौतुक केलं जातंय. काशी-विश्वनाथच्या कॉरिडोरच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या आधी नरेंद्र मोदी मजुरांमध्ये गेले. त्यांनी त्यांच्यासोबत बसून ग्रुप फोटोही काढला. या क्षणाचा व्हिडीओ कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या इंस्ट्राग्रामवर पोस्ट केला आहे.
#NarendraModi #viralvideo #Kashi #india