#MESMALaw #StWorkers #StateGovernment #AnilParab #MaharashtraTimes
एसटीचे राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ताणून धरलेल्या संपामुळे एसटीत मेस्मा का लावण्यात येऊ नये यावर वेळोवेळी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. दरम्यान वेतनवाढ देऊनही संपकरी मागे हटत नसल्याने अखेर नाईलाजास्तव मेस्मा कायदा लागण्याची शक्यता आहे.त्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण अधिकार परब यांना दिले आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान करण्याची इच्छा नसतांनाही 20 तारखेनंतर मेस्मा लावण्यासंदर्भात एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.संपाचा तिढा कायम आहे. सरकारने शक्यतेपेक्षा जास्त पगारवाढ दिली आहे मात्र अजूनही ते भरकटलेले व दिशाहिन झाले आहे. अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.