Kolhapur l ST सेवा सुरु करा; कळेतील विद्यार्थ्यांचे आंदोलन l ST Strike l Sakal
कोल्हापूर - एसटीची सेवा त्वरित सुरू करण्यासाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कळे येथील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. गेले काही दिवस एसटी सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. यावेळी एसटी सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. हातात फलक घेऊन एसटी सुरु करण्याची मागणी केली. दरम्यान, ज्येष्ट नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला होता.
#KolhapurNewsUpdates #KolhapurLiveUpdates #Kolhapur #STStrike #STAndolan #MaharashtraNews #MarathiNews #StudentsProtest #maharashtra #esakal #SakalMediaGroup