#GroupCaptainVarunSingh #HelicopterCrash #MaharashtraTimes
हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.वरुण सिंह यांचे पार्थिव गुरुवारी विमानानं बंगळुरुहून भोपाळला नेण्यात आलं होतं.पार्थिवावर बैरागढ येथील विश्राम घाटावर शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. लष्कर आणि निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांनीही ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.बंगळुरू येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वरुण सिंह यांच्यावर बंगळुरुतील रुग्णालयात उपचार सुरु होते