#AliaBhatt #Brahmāstra #Entertainment #MaharashtraTimes
प्रेक्षक गेले अनेक दिवस 'ब्रह्मास्त्र' सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर बुधवारी सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ब्रह्मास्त्र'च्या मोशन पोस्टर लाँचनंतर आलिया मायानगरीत परतली. या मोशन पोस्टरमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. या सिनेमाद्वारे रणबीर-आलियाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे.