शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावी आणि बारावी लेखी परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. यंदा ऑफलाइन पद्धतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. बारावी बोर्डाची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ तर प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत घेण्यात येणार आहेत. दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येणार असल्याचं त्या म्हणाल्या आहे. तर दहावीच्या तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत घेण्यात येतील. करोनामुळे २०२०-२०२१ वर्षातील दहावी आणि बारावी इयत्तेच्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.
#varshagaikwad #boardexam #maharashtra #SSCExam2021 #hscexam2021