सर्वोच्च न्यायालयाने आज बैलगाडा शर्यती संदर्भात सुनावणी केली आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतल्यानं शर्यतप्रेमी आणि हौशी लोकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. दरम्यान, बैलगाडी शर्यतीला परवानगी दिल्यानंतर कोल्हापूरातील कसबा बावडा परिसरात गुलालाची उधळण करत जल्लोष केला.