#BullockCartRace #Farmer #SupremeCourt #MaharashtraTimes
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला.शेतकऱ्यांनी गुलाल उधळत सेलिब्रेशन केलं आहे.सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी दिली आहे. हा विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा आणि सर्जा-राजाचा आहे अशी प्रतिक्रिया बैलगाडा मालकांनी दिली आहे. आमचा वनवास संपला असं म्हणत साताऱ्यात शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. शेतकऱ्यांनी गुलालाची उधळण करत सेलिब्रेशन केलं आहे.