मुंबईत दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत. टिळकनगर परिसरात मोटारसायकल चोरांचा सुळसुळाट होता. पण पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून २ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ९ गाड्या जप्त केल्या आहेत. सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यांना पुण्यातून अटक केली आहे.