राज ठाकरे पुणे दौऱ्यावर; पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन घेतला पाहुणचार

2021-12-15 1,199

राज ठाकरे आज १५ डिसेंबरला पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी सकाळी ८ वाजता सुरुवातीला शिवाजीनगर गावठाण येथील मनसे पदाधिकारी अनिकेत ढगे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे पोहे आणि उपम्याचा नाश्ता केला. यानंतर ते बॅकवेट हॉल, झाशीची राणी चौक बालगंधर्व येथे दुपारी १२ ते २ या वेळेत असतील. सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत ते कोथरूड मतदारसंघात रत्ना बॅक्वेट हॉल (कर्वेनगर) येथे असतील.

Videos similaires