नागपूर आणि अकोला विधानपरिषद निवडणुकीचे निकाल समोर आले असून नागपूर विधानपरिषद जागेसाठीच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला. तर अकोला विधानपरिषद जागेसाठीच्या निवडणुकीमध्ये वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला आहे. १७६ मतांनी बावनकुळे आणि १८६ मतांनी वसंत खंडेलवाल विजयी झाले आहेत. भाजपानं या दोन्ही जागा मोठ्या फरकानं जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांचाच पराभव झाल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलंय.