'मिस युनिव्हर्स २०२१' चा किताब जिंकून भारताची हरनाझ संधू विश्वसुंदरी बनली आहे. मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून व्हिडीओ पोस्ट करून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. “नवीन मिस युनिव्हर्स आहे…इंडिया,” असं कॅप्शन त्या व्हिडीओला देण्यात आलंय. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला आहे. याआधी २००० साली अभिनेत्री लारा दत्ताने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. भारताला २१ वर्षांनंतर 'मिस युनिव्हर्स'चा ताज जिंकून देणाऱ्या विश्वसुंदरी हरनाझ संधूबद्दल जाणून घेऊया.
#MissUniverse2021 #harsaansindhu #india