#Schools #SchoolReopen #CoronaRules #MaharashtraTimes
अखेर 13 डिसेंबर पासून नांदेड मधील शाळा सुरू झाली आहे. 3115 शाळांत तीन लाख विद्यार्थी आहेत. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होणार होत्या,मात्र राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याने खबरदारी म्हणून शाळांबाबतचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला.शहरी भागात पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागात पहिली ते चौथी शाळा सुरू होणार.जिल्ह्यातील तीन हजार 118 शाळांमध्ये तीन लाख विद्यार्थी आहेत.करोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.शंभर टक्के शिक्षकांना करोनाची लस घेणे बंधनकारक आहे.एका वर्गात केवळ 15 ते 20 विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली आहे.