#UdaySamant #BachavSamiti #MaharashtraTimes
चिपळूण पूर मुक्त करण्यासाठी चिपळूण बचाव समितीचे प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे.उपोषणाच्या सातव्या दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी भेट दिली.उदय सामंत यांनी चिपळूणकरांसाठी महत्त्वाचे पाऊल उचललं आहे."1000 कोटी देतो असे काही आश्वासन देणार नाही. जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळवून देण्याचा प्रयत्न करेन".चिपळूणकरांना वचन देत त्यांना हवी ती मदत देण्याचे आश्वासन दिले