कोल्हापुरात गव्याची शोधमोहीम पोहाळे, शिरोली परिसर (Shiroli) जंगल आणि कोडोली तसेच कुशिरे या भागात सुरू आहे. यासाठी वनविभागाने चार स्वतंत्र पथके नेमली आहेत. या पथकांमार्फत गव्याचा माग काढला जात आहे. सकाळपासून अद्यापही गवा कोठेही दिसलेला नाही. मात्र तो गिरोली जंगल अथवा कुशिरे पोहाळे भागातील ऊस शेतीत लपला असावा असा वन विभागाचा अंदाज आहे. गवा (Bison) आक्रमक झालेला असून रस्त्यावरून फिरताना लोकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वन विभागाच्या एका पथकामार्फत केले आहे. ही पथके गावोगावी जाऊन ध्वनिक्षेपकद्वारे लोकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत आहे.