#PetrolDieselRate #GoldRate #PetrolAndDieselRate #MaharashtraTimes
देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) आज ऑटो इंधन दरात वाढ केली नाही. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 109.98 रुपये आणि 94.14 रुपये प्रति लीटर आहेत.मुंबईतील चारही मेट्रो शहरांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहेत.दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर ,तर डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर.मात्र गेल्या महिनाभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही.तर, सोने,चांदीचे दर पुन्हा वाढलेआहेत.गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,७९० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे.मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,७९० प्रति १० ग्रॅम आहे.पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२५० असेल, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,५५० रुपये असेल.तर, चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१२ रुपये आहे.