Raigad : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर चार गाड्यांचा विचित्र अपघात, तिघांचा मृत्यू

2021-12-12 1

#Accident #MumbaiPuneExpressWayAccident #BusAccident #MaharashtraTimes
मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाट उतरताना प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली.महामार्गाच्या मध्यभागी काँक्रिटीकरण सुरु असताना प्रवासी बसने सिमेंट बल्कर आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या काही कामगारांना धडक दिली.प्रवासी बसच्या धडकेत एक्सप्रेस वेवर काम करणाऱ्या तिघा कामगारांचा मृत्यू, तर दोन गंभीर जखमी झालेत. उपचारार्थ नेत असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मध्यरात्री च्या सुमारास खोपोली हद्दीमध्ये अपघात झाला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला. बस मधील सर्व प्रवासी सुखरूप मात्र काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.बसमधील सर्व प्रवाशांना इतर दोन बसने मुंबईकडे रवाना केले आहे.

Videos similaires