लाफ्टर क्वीन भारती सिंह होणार आई; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत दिली खुशखबर

2021-12-11 343

लाफ्टर क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारती सिंहने चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. भारती लवकरच आई होणार आहे. तिने स्वतः याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. भारती सिंहने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. भारतीच्या या पोस्टवर कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला. भारतीने २०१७मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. सध्या भारती ‘डान्स दीवाने’ शोच्या मंचावर पती हर्ष लिम्बाचियासोबत धमाल करताना दिसत आहे.

Videos similaires