मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रात पेडणेकर यांच्याबद्दल अश्लील भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर कुटुंब संपवण्याचा इशारा पत्राद्वारे दिला आहे. हे धमकीचे पत्र पनवेल येथून कुरिअरद्वारे आल्याची माहिती देण्यात आली आहे.\" माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने पाहू नका,\" असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे.