तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारच्या हेलिकॉप्टर अपघातातील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे एक पत्र चर्चेत आहे. वरुण सिंग यांनी सप्टेंबरमध्ये त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्रात विद्यार्थ्यांना सामान्य असणे ठीक आहे असे सांगितले आहे. ग्रुप कॅप्टन सिंग सध्या बंगळुरूच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा प्रेरणादायी संदेश दिला होता.
#BipinRawat #helicopteraccident #varunsingh #viralletter