Beed l अखेर दोन डबे घेऊन रेल्वे धावली l Indian Railways l Sakal

2021-12-09 15

अखेर दोन डबे घेऊन रेल्वे धावली...

आष्टी (जि.बीड) - अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील अहमदनगर ते कडा या ४५ किलोमीटर अंतरापर्यंत गुरुवारी (ता.०९) दोन डब्बे घेऊन रेल्वेची चाचणी घेण्यात आली. या अगोदर अहमदनगर ते सोलापूरवाडी पर्यंत रेल्वेची चाचणी घेण्यात आली होती. या मार्गावरील मेहकरी नदीवरील खुंटेफळ साठवण तलावावरील अर्धाकिलोमीटर लांब व शंभर फूट उंचीचा सर्वात मोठ्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून अहमदनगर ते आष्टी या ६४ किलोमीटर अंतरावरील लोहमार्गाचे काम ही पूर्ण झाले आहे. लवकरच या रेल्वे मार्गावर हायस्पीड रेल्वे धावणार असून लवकरच जिल्हावासीयांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. (व्हिडिओ : निसार शेख)


#maharashtraliveupdates #ashti #beednews #beednewsupdates #maharashtrabreaking #breakingnews #IndianRailways #RailwayUpdates #beedbreaking #MarathiNews #esakal #SakalMediaGroup