यशोमती ठाकुरांनी निवेदन नाकारलं आणि तरुणालाही दिलं पोलिसांच्या ताब्यात

2021-12-09 1,883

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना धमकी देणाऱ्या तरुणाला गाडगे नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. निवेदन देण्यासाठी सदर तरुण हा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आला असता त्याने पालकमंत्र्यासोबत वाद घातला आणि धमकी दिली. त्यानंतर लगेच पालकमंत्र्यांनी पोलिसांशी संपर्क करून तक्रार केली. या संपूर्ण प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Videos similaires