#mhaswad #mhaswadnews #britishagelake #lake
म्हसवड : ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव परतीच्या व त्यानंतर गेल्या आठवड्यात दमदार झालेल्या अवकाळी पावसाने लागोपाठ यंदा दुसऱ्या वर्षीही पूर्ण क्षमतेने भरले असून, २५ फूट पाणी असल्याने तलावाच्या सांडव्यावरून पहाटेपासून पाणी पडण्यास सुरवात झाली. तलाव भरून वाहू लागल्यामुळे माण व त्याखालील आटपाडी, सांगोला या दुष्काळी पट्ट्यात समावेश असलेल्या तालुक्यातील शेतकरी सुखावला असून, या तलावाचे सांगली, सोलापूर, सातारा या तीन जिल्ह्यांतील गावांना ४४,२०६ एकर क्षेत्रातील शेतीसाठी हे पाणी उपयुक्त ठरणार आहे. (व्हिडिओ : सल्लाउद्दीन चोपदार)