राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आव्हाडचा विवाहसोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला. एकीकडे अनेक नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्नं लावत असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते.
#jitendraawad #kajalawad #wedding