#OmicronVariant #Maharashtra #MaharashtraTimes
महाराष्ट्रामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पुणे शहरात एक तर पिंपरी चिंचवडमध्ये सहा असे एकूण सात रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळले आहेत. त्यामुळे ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या राज्यात आठपर्यंत पोहोचली आहे. ओमिक्रॉन या करोनाचा नवा व्हेरिएंट आधीच्या इतर व्हेरिएंटपेक्षा अधिक घातक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. यासाठी अधिक खबरदारी घ्यावी लागणार असून कोरोनाचा नवा 'ओमिक्रॉन' व्हेरिएंट किती भयंकर? कशी घ्याल काळजी? 'ओमिक्रॉन' व्हेरिएंट मुलं पुन्हा लॉकडाऊन? अशा विविध प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही बातचीत केलीये आय.एम.ए. महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आणि आरोग्यतज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी...