४ डिसेंबरच्या सकाळी डोंबिवली स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असलेली महिला तोल जाऊन खाली पडली. सुदैवाने तिथेच उपस्थित असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या दोन जवानांनी प्रसंगावधान राखत या महिलेचे प्राण बचावले. डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी यासंबंधी माहिती दिली. विवेक पाटील आणि किरण राऊत असे या जवानांचे नाव असून या दोघांचे सगळ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.