राज्यात १ डिसेंबर रोजी अचानक हजेरी लावलेल्या पावसाने सगळ्यांचीच धांदल उडवली. डिसेंबर महिन्यात हा पाऊस 'बिन बुलावा मेहमान' सारखा दाखल झाल्याने सगळेच बुचकळ्यात पडले. ऐन हिवाळ्यात पाऊस पडल्यामुळे राज्यात सर्वत्र हिवसाळ्याचा अनुभव नागरिकांना आला. डिसेंबर महिन्यातील या पावसामुळे राज्यात कडाक्याची थंडी पडली आणि नागरिक गारठले. एरव्ही भल्याभल्यांची दांडी गुल करणाऱ्या पुणेकरांची मात्र या अवेळी आलेल्या पावसाने विकेट घेतली. हुडहुडी भरलेल्या पुणेकरांनी थंडीपासून बचावासाठी स्वेटर खरेदी करण्यासाठी दुकानांकडे धाव घेतली. पण घराबाहेर पडताच पुणेकर संभ्रमात पडले. डिसेंबर महिन्यात पाऊस पडत असल्याने स्वेटर घ्यायचा की रेनकोट? असा प्रश्न पुणेकरांना पडला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असणाऱ्या पुणेकरांना स्वेटर घ्यायचा की रेनकोट? या प्रश्नाचं उत्तर मिळालं का, हे पुणेकरांकडूनच जाणून घेऊया.
#Pune #Winter #Rain
Punekars Confused due rains during winter season