Kolhapur l जिल्ह्यात अवकाळीने दैना, जनजीवन विस्कळीत l Kolhapur Rains l Sakal

2021-12-02 270

#KolhapurRains #KolhapurNewsUpdates #MaharashtraRains #SugarcaneFarms #Farmers #Shetkari #FarmsDestroyedDueToRains #MarathiNews #ऊसतोडी कामगार #MarathiNews #esakal #SakalMediaGroup
कोल्हापूर, ता. १ : हिवाळ्यात सुद्धा पावसाची अनुभूती आज कोल्हापूकरांनी घेतली. जिल्ह्यात काल दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसाने शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटताना पाऊस सुरू झाल्याने विद्यार्थी, पालकांची तारांबळ उडाली. रात्रीही विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढला होता. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अशी स्थिती झाल्याचे सांगण्यात येते.
पावसाने रब्बी पिकांची मशागत खोळंबली असून, काही ठिकाणी भात झडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली. ऊस पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ऊस तोडीवरही पावसाचा परिणाम झाला असून प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी धास्तावला आहे.
अवकाळी आणि मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे गुराळ घराचे आणि ऊस तोडणी कामगारांच्या पालावरची झालेले नुकसान झाले आहे.

व्हिडिओ - बी. डी. चेचर