मुंबईसह महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. मागच्या आठवड्यात देखील असाच पाऊस सुरू होता. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. पुढच्या आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा थंडी पडू शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.