राज्यात १ डिसेंबर २०२१ रोजी सकाळपासून मुंबई, मुंबई उपनगर, पुणे आणि कोणक किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. ३ डिसेंबरपर्यंत राज्यातील विविध भागांत मुसळधार बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसासह काही भागांत वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.