स्थानिक निवडणुकांवरून चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला लगावला टोला

2021-11-30 557

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवारांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने संपूर्ण पक्ष संपवला असे ते यावेळी म्हणाले. तसेच आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढवल्या जातील. संबंधित जिल्हाध्यक्षांनी त्यांच्याशी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय परस्पर घ्यायचा नाही असेही त्यांनी यावेळी बजावले आहे.

Free Traffic Exchange

Videos similaires