राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. शिवडीतील न्यायालयाबाहेर नवाब मलिकांच्या समर्थकांनी आंदोलन केले. नवाब मालिकांवर भाजपा नेते मोहित कंबोज आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. तर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि कुटुंबीयांनी मलिकांवर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. याविरोधात नवाब मलिकांच्या समर्थकांनी मुंबईतील शिवडी येथील न्यायालयाबाहेर शक्तिप्रदर्शन केले.