देशाचे रक्षण करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. २२ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार देऊन या जवानांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शूरवीरांचा सन्मान स्वीकारण्यासाठी त्यांच्या माता आणि पत्नी उपस्थित होत्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.