कल्याणमधील कांबा गाव परिसरातील टाटा पावर कंपनीत सात फुटाचा अजगर आढळला. यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी कंपनीत अजगर आल्याची माहिती सर्पमित्रांना दिली. त्यांनतर सर्पमित्र विवेक गंभीरराव व संदेश वाडेकर यांनी अजगराला पकडून कल्याण वनविभाग खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले असून लवकरच या अजगराला जंगलात सोडण्यात येणार आहे. मात्र या परिसरात अजगर आढळल्याने सर्पमित्रांसह परिसरातील नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहे.