एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत प्रवेश नाही; मुंबई-पुणे महामार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात

2021-11-20 302

आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यातील अनेक एसटी कर्मचारी मुंबईत दाखल होत आहेत. यासाठी ते मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करत असल्याचं दिसून आलंय. या कर्मचाऱ्यांना मुंबईत जाता येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खारघर टोल नाक्यावरून जाणाऱ्या प्रत्येक गाडीची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. त्यामध्ये एसटी कर्मचारी आढळल्यास त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. आतापर्यंत ६० ते ८० एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

Videos similaires