नौदलाची सर्वात अत्याधुनिक युद्धनौका आयएनएस विशाखापट्टनम सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज

2021-11-19 973

माझगाव डॉकमध्ये 15 B प्रकारातील युद्धनौकांची बांधणी युद्धपातळीवर सुरू आहे. यामधील पहिली युद्धनौका आयएनएस विशाखापट्टनम नौदलात लवकरच दाखल होणार आहे. सुमारे ७४०० टन वजनाची ही युद्धनौका नौदलातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक युद्धनौका ठरली आहे. ब्रम्होस, बराक क्षेपणास्त्रांमुळे युद्धनौकेची ताकद वाढली आहे. स्टेल्थ रचनेमुळे शत्रू पक्षाला युद्धनौकेचा ठावठिकाणा रडारवर लावणे सहज शक्य होणार नाही हे विशेष.

Videos similaires