बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत १९४७ मध्ये देशाला मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ नंतर मिळालं असं वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. कंगनाने केलेल्या या वक्तव्याचा निषेध करत तिला दिलेले राष्ट्रीय पुरस्कार काढून घेण्याची मागणी होत आहे. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाने केलेल्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. 'कंगना जे म्हणाली ते बरोबर आहे.', असं म्हणत त्यांनी स्वातंत्र्य दिलं गेलं असल्याचं म्हटलं आहे.
#vikramgokhle #kangnaranaut #bollywood