Satara: साताऱ्यात शिवसेनेकडून कंगना राणावतचा निषेध

2021-11-14 1

#satara #sataranews #kanganaranaut #kanganaranaurstatment
सातारा : देश स्‍वातंत्र्‍याविषयी वादग्रस्‍त विधान केलेल्‍या अभिनेत्री कंगना राणावत यांचा आज सातारा येथे शिवसैनिकांनी निषेध करत प्रतीकात्‍मक पुतळ्यास जोडे मारले. आंदोलनाच्‍या पार्‍श्‍वभूमीवर त्‍याठिकाणी बंदोबस्‍तास असणाऱ्या पोलिसांनी आंदोलकांच्‍या हातातून राणावत यांचा प्रतीकात्‍मक पुतळा ताब्‍यात घेत जप्‍त केला.
एका खासगी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्‍यान अभिनेत्ती कंगणा राणावत यांनी देश २०१४ मध्‍ये स्‍वतंत्र झाला असून १९४७ साली भिक मिळाली होती, असे वक्‍तव्‍य केले होते. या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याचा देशभर निषेध होत असून ठिकठिकाणी राणावत यांच्‍याविरोधात देशद्रोहाचे गुन्‍हे नोंदविण्‍यात येत आहेत. याच अनुषंगाने आज सातारा येथील पोवईनाका परिसरात शिवसैनिकांनी आंदोलन करत राणावत यांचा निषेध केला तसेच त्‍यांच्‍या प्रतीकात्‍मक पुतळ्यास जोडे मारले. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)

Videos similaires