जाणून घ्या : त्रिपुरात असं काय घडलं ज्यामुळे अमरावतीत दंगा होतोय?

2021-11-13 16,605

त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. त्रिपुरामध्ये मुस्लिम बांधवांवर झालेल्या अत्याचारांविरोधात अमरावती शहरात १२ नोव्हेंबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ ते २० हजार लोकांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात अमरावती शहरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली तर काही दुकानादारांना मारहाण देखील करण्यात आली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला. या मोर्चा विरोधात भाजपाने अमरावती शहर बंदचे आवाहन केलं. मात्र, या बंद दरम्यान देखील आंदोलकांनी हिंसा केली. पण त्रिपुरा राज्यात नेमकं काय घडलं होतं ज्यामुळे अमरावतीत दंगा सुरु आहे? , जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून.

#bangladesh #tripura #amravati #hindumuslim

Videos similaires