पद्म पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदा तब्बल १० जणांना पद्मभूषण पुरस्कार, १०२ व्यक्तींना पद्मश्री आणि सात जणांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर कला क्षेत्रातील २९ जणांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या सर्व कलाकारांचा पुरस्कार देऊन गौरव केला. महाराष्ट्रातील गायक सुरेश वाडकर, दिग्दर्शक करण जोहर, निर्माती एकता कपूर यासोबतच बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतला सुद्धा पद्मश्री देऊन गौरविण्यात आले. परंतु कंगनाला मिळालेला हा पुरस्कार अनेकांना रुचला नसून यावर सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु झाली आहे.