काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी लिहलेल्या THE SAFFRON SKY पुस्तकात आता हिंदुत्वाची तुलना ISIS आणि बोको हरामसारख्या कट्टरपंथी जिहादी गटांशी केली आहे. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या वक्तव्याबाबत सलमान खुर्शीद यांनी माफी मागावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. सलमान खुर्शिद यांनी हिंदुत्व काय आहे हे वाचा असा सल्ला शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी दिला आहे.