माधुरी दीक्षितची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत; मुलावर होतोय कौतुकाचा वर्षाव

2021-11-08 4,045

धक धक गर्ल माधुरी दीक्षितच्या अदांमुळे चाहते घायाळ होतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत माधुरी तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. माधुरी दीक्षितने कॅन्सर जागरूकता दिनानिमित्त केलेली इंस्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. परंतु ही पोस्ट माधुरी संदर्भात नसून तिचा छोटा मुलगा रियान संदर्भात आहे. रियानाने त्याचे केस तब्बल २ वर्ष वाढवून ते कॅन्सर रुग्णांना दान केले आहेत आणि म्हणूनच त्याचं कौतुक कारण्यासाठी माधुरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून रियानचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला तिने कॅप्शन देऊन रियानला हिरो देखील म्हटलं आहे.

#MadhuriDixit #Instagram #NationalCancerDay #HairDonation

Videos similaires