#harne #harnebeach #dapoli #kokan #beach #ocean #fish #fishmarket
हर्णे : कोरोनामुळे थांबलेल्या पर्यटन उद्योगाला बऱ्यापैकी सुरुवात होत असताना पर्यटकांची मात्र दिवाळी सुट्टीच्यानिमित्ताने प्रचंड आवक सुरू झाली आहे . सरकारने सर्वच उद्योगावरील उठवलेल्या बंदीमुळे कित्येक महिने कंटाळलेला पर्यटक आवर्जून ताजी मासळी व सुकी मासळी खाण्यासाठी व खरेदीसाठी हजेरी लावू लागले आहेत. यावेळेस मासळीची आवक खूपच कमी असल्याने बंदरामध्ये असणाऱ्या चिमणी बाजारामध्ये मासळी खरेदी करण्याचे आकर्षण पर्यटकांमध्ये दिसून येत आहे.
(बातमीदार; राधेश लिंगायत)